dr.satish best web design developer for mac

लिंगनूर क ll नेसरी ग्रामपंचायत :

कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील दक्षिणेस कर्नाटक सिमालगत लिंगनूर क ll नेसरी हे गाव वसले आहे. गडहिंग्लज पासून 21 किलोमीटर अंतरावर असलेल्या आमच गाव प्रत्येक ऋतूत विविध रंगांची उधळण अगदी मुक्तहस्ते करीत असताना भासत. मग...ती शिशिराची पानगळ असो, जर्द पिवळे हेमंताचे सुवर्णवैभव असो, वसंताचा शृंगार साज असो किंवा श्रावणातील ऊन-सावलीचा खेळ! प्रत्येक ऋतूचे लावण्य न्याहाळताना निसर्ग एक मोठा किमयागार वाटतो. गावाच्या शेजारी मुंगुरवाडी, हेब्बाळ जालाद्याळ जांभुळवाडी ही गावे वसलेली आहेत. गावात प्राचीन महादेव मंदिर, हनुमान मंदिर, महालक्ष्मी मंदिर ही मंदिरे असून श्री भावेश्वरी देवी गावाचे ग्रामदैवत आहे. गावामध्ये ऊस हे प्रमुख पिक घेतले जात असून सोयाबीन, भात ज्वारी ही पिकेही खरीप हंगामात घेतली जातात.


ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

आमच्या गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना 27 एप्रिल 1964 साली झाली आहे. गावची निवडणूक ही दर पाच वर्षानी होते. ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी गावाचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच व इतर सहा सदस्यांची गावातील नागरिकांच्या एकमताने नेमणूक केली आहे. गावामध्ये वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायतीमधून घरपती मोफत रोपे वाटप करण्यात आली आहेत.

सरपंच
सौ. अनुराधा अरुण देसाई

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करते.

उपसरपंच
श्री. संतोष जयसिंगराव देसाई

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. किशोर विठोबा पाटील

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
Lingnoor K.Nesari Grampanchayat
A/p - Lingnoor K.Nesari Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416504

CONTACTS
Phone :

Office :